संगमेश्‍वर तालुक्यातील शास्त्री नदीच्या पात्राच्या पाण्याबाहेर मगर आल्याने घबराट


संगमेश्‍वर तालुक्यातून वाहणार्‍या शास्त्री नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा मुक्त संचार सुरू असून, यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात पुराच्या प्रवाहाबरोबर ही मगर या भागात आली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे मगरीचे दर्शन वारंवार घडू लागले असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शास्त्री नदीत मगर असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुरू होती. मात्र आज या चर्चेला प्रत्यक्ष पुराव्यासह दुजोरा मिळाला. संगमेश्‍वर येथील रहिवासी जमीरूद्दीन मुजावर हे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना महामार्गालगत असलेल्या नदीपात्रात एक मोठी मगर पाण्याबाहेर येवून उन्हात बसलेली दिसली. त्यांनी तातडीने या मगरीचे छायाचित्र आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. हे छायाचित्र सोशल मिडियावर वेगाने प्रसारित झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button