
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे पेट्रोलने चूल पेटवताना महिला भाजून जखमी
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे पेट्रोलने चूल पेटवत महिला भाजून गंभीर जखमी झाली. द्रौपदी चंद्रकांत पवार (४२, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. अधिक उपचारासाठी या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रौपदी ही चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत वास्तव्याला असते. २८ डिसेंबर रोजी दुपारी पेट्रोलने चूल पेटवत असताना आगीचा भडका उडाला व तिच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यामध्ये ती ७० टक्के भाजली. तत्काळ तिला उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
www.konkantoday.com




