
शिवसेना अन् ‘धनुष्यबाण’ कोणाचा, ठाकरे की शिंदे? सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट
सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्ष कोणाचा यावरील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी ही सुनावणी पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत आज केवळ दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित कामकाज पाहणार आहेत. त्यानंतर सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्यासह ‘अरवली डोंगररांगा’ प्रकरणाच्या विशेष सुनावणीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित प्रकरणांना पुरेसा वेळ मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे. शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्षाबाबतची सुनावणी ही आजच्या कामकाजाच्या यादीत ३७ व्या क्रमांकावर होती. त्यामुळे आज सुनावणी होणे अशक्य असल्याचे म्हटले जात होते.




