शिंदेंनी राग, लोभ बाजूला ठेवून मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, आमदार भास्कर जाधव


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यंदाचे वर्ष हे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे आहे. पण याचवर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही याचे प्रचंड दुःख आहे. त्यामुळे शिंदेंनी राग, लोभ बाजूला ठेवून मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, असे ते म्हणालेत.
भास्कर जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही. याच्यासारखे दुःख नाही. याविषयी माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. त्यामुळे जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगतात, जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचा दावा करतात, त्या सर्वांना मी आवाहनवजा विनंती करतो की, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button