शालेय सहली मधून रत्नागिरी विभागास तब्बल सरासरी एक कोटी 59 लाख 48 हजार 236 रुपये इतके उत्पन्न


रत्नागिरी विभागाच्या वतीने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीसाठी नव्या कोऱ्या बसेस अशा विशेष बस दिल्या होत्या. नोव्हेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत 9 आगारातून 931 एसटी बसेस हजारो-लाखो कि.मी.धावल्या. त्यातून रत्नागिरी विभागास तब्बल सरासरी एक कोटी 59 लाख 48 हजार 236 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक उत्पन्न डिसेंबर महिन्यात मिळाले आहे. एकंदरीत, शैक्षणिक सहली लालपरीतून करा हा निर्णय, नव्या कोऱ्याबसेस दिल्यामुळे 9 आगार मालामाल झाली आहेत.

हिवाळा हंगामामधील नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने शाळा, महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक, ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षापासून सहली या एसटी बसेसमधून आयोजन करा असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button