वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या बचाव पथकाने विहिरीत पडलेल्या अजगराला वाचविले


चिपळूण तालुक्यातील तनाळी येथे सुमारे ३० फूट खोल विहिरीत अनेक दिवसांपासून अडकलेल्या अजगर जातीच्या पिल्लाचे वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या बचाव पथकाने यशस्वी रेस्क्यू करून त्यास जीवदान दिले.दोन दिवसांपूर्वी तनाळी येथील विक्रांत टेरवकर व सिद्धेश डिंगणकर यांनी वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून विहिरीत अजगराचे पिल्लू अडकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व सर्पमित्र प्रथमेश पवार, प्राणीमित्र जाकिर परकार व जिल्हा कार्याध्यक्ष अमित जाधव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीत सुमारे १० ते १५ फूट पाणी असल्याने अजगरास तात्काळ पकडणे शक्य नव्हते. विविध उपाययोजना करूनही यश न आल्याने विहीर रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री. डिंगणकर यांच्या सहकार्याने दोन दिवसांत विहीर पूर्णतः खाली करण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र प्रथमेश पवार यांनी विहिरीत उतरून अजगर पिल्लास सुरक्षितरीत्या पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button