
लाडकी बहिण योजनेतील ई केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुकीमुळे हजारो पात्र महिला मासिक हप्त्यापासून वंचित
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील ई केवायसी प्रक्रियेत हो-नाही या शब्दांच्या चुकीमुळे राज्यातील हजारो पात्र महिला नोव्हेंबरच्या मासिक हप्त्यापासून वंचित राहिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ई केवायसीमधील ही चूक दुरूस्त करण्यासाठी पात्र महिलांना एक शेवटची संधी द्यावी आणि नोव्हेंबरचा रखडलेला हप्ता तत्काळ जमा करावा अशी मागणी कर्ला माजी सरपंच दीपक सुर्वे यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्र सादर केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ३१ डिसेंबर २०२५ च्या आत ई केवायसी पूर्ण केली असतानाही ऍपमध्ये हो किंवा नाही असे शब्द भरताना अनेक लाडक्या बहिणींकडून अनावधानाने शब्द चुकला. जिथे हो भरायचा होता तिथे नाही किंवा जिथे नाही भरायचा होता तिथे हो शब्द भरला गेल्याने ही चूक झाली आहे. घाई गडबडीने झालेल्या या चुकीमुळे राज्यातील बहुसंख्य लाभार्थी पात्र असूनही लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्हा स्तरावरील कार्यालयांमध्ये याबद्दल चौकशी करण्यासाठी गेले असता, संबंधित कर्मचार्यांकडून ही तुमच्याकडून झालेली चूक आहे. याला आम्ही जबाबदार नाही किंवा तुम्ही मंत्रालय सबंधित वरिष्ठ विभागाकडे विचारणा करा अशी उत्तरे दिली जात आहेत. यामुळे गरजू-गरीब महिलांमध्ये खुप नाराजी आणि भावनिक असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com




