लांजा तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध, संशयिताला २० वर्षे कारावास…


लांजा तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध प्रस्थापित करणार्‍या आरोपीला न्यायालयाने २० वर्षे कारावास व ११ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. साहिल दत्ताराम मसणे (२१, लांजा) असे आरोपीचे नाव आहे. जुलै २०२२ मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी साहिल याच्याविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नांगिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून ऍड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. जुलै २०२२ मध्ये पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
दरम्यान यातून पीडिता गर्भवती राहिली होती. यावेळी नातेवाईकांनी चौकशी केली असता पीडितेने सर्व हकिगत कथन केली. त्यानुसार संशयित आरोपी साहिल याच्याविरुद्ध लांजा पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (एफ), ३७६ (बी) ३७६ (जे) (एन) व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) चे कलम ३, ४, ५, ६, प्रमाणे गुन्हा दाखल केला. लांजा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी आरोपीला अटक केली. तसेच गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button