
रायगड जिल्ह्यातील अलिबागचा हापूस आंबा सर्वप्रथम वाशी एपीएमसीत
कोकणच्या मातीतून आलेला, सुगंध आणि चविसाठी देशभरात प्रसिद्ध असलेला अलिबागचा हापूस आंबा यंदाच्या हंगामात सर्वप्रथम वाशी येथील एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक शेतकरी गौरव शंकर पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या दोन पेट्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या असून यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी पाठविण्याचा मान गौरव पाटील यांना मिळाला आहे.
अलिबागचा हापूस आंबा हा| केवळ स्थानिक ग्राहकांच्याच नव्हे, तर देश-विदेशातील ग्राहकांच्या विशेष पसंतीचा आहे. वाशी एपीएमसीच्या माध्यमातून हा आंबा मुंबईसह देशातील विविध भागांमध्ये तसेच परदेशातही पोहोचतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील हापूस आंब्याला दरवर्षी मोठी मागणी असते.
www.konkantoday.com




