
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयुक्तांबरोबर कर्मचारी प्रश्नावर चर्चा यशस्वी
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत २० रोजी नवी मुंबई येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनासह विविध प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
केंद्र सरकारकडून मिळणारे ४५०० रुपये मानधन नवीन एसएनए प्रणालीमुळे रखडले असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच डिसेंबर महिन्याचे मानधन त्वरित जमा केले जाईल, असे आश्वासन अर्थ व लेखा विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिले. तसेच, ज्या महिलांना ऑक्टोबर २०२४ पासून प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही, त्यांच्या खात्यातही डिसेंबर महिन्यापर्यंतचा ६० टक्के भत्ता लवकरच जमा केला जाणार असून उर्वरित रक्कमेसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com




