
राज्याच्या सात सागरी जिल्ह्यांमधील स्वतंत्र अंमलबाजवणी कक्षासाठी प्रमुख १४४ पदांसह एकूण २३२ पदांच्या निर्मितीस मंजुरी
राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी वर्षभरापूर्वी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाच्या कडक अंमलबजावणीसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची घोषणा केली होती. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या पदांकरिता मंजुरीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली असून राज्याच्या सात सागरी जिल्ह्यांमधील स्वतंत्र अंमलबाजवणी कक्षासाठी प्रमुख १४४ पदांसह एकूण २३२ पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील स्थानिक अवैध पर्ससीन आणि एलईडी मासेमारी नौकांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा आणि त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी वर्ग नियुक्त करावा, अशी राज्यातील पारंपरिक मच्छीमारांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यास अनुसरून सात सागरी जिल्हयांसाठी अतिरिक्त पद निर्मितीस शासनाने मान्यता दिली आहे.www.konkantoday.com




