
राजापूर शहरातील विविध भागातील ४७विकास कामांना ६ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर
शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत राजापूर शहरातील विविध भागातील ४७विकास कामांना ६ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून व राजापुरचे आ. किरण सामंत यांच्या विशेष पाठपुरावा व प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिली. तर शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही लवकरच मागी लावून शहरवासियांना २४तास मुबलक पाणीपुरवठा करण्याचा आ. किरण सामंत यांचा संकल्प लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याचेही काझी यांनी सांगितले.
राजापूर शहरातील विकास कामांना शासनाकडून निधी मिळावा यासाठी आ. किरण सामंत हे सातत्यान पाठपुरावा करत आहेत. तर राजापुरच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यापूर्वीच दिली.www.konkantoday.com




