राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेकरला अल्पकालीन जामीन


राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेकरला ६ आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला आहे. वैद्यकीय कारणासाठी आंबेकर याने जामिनासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार आंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला.
कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे याचा थार गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी आंबेकर याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२ नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ७ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. आंबेकर याने न्यायालयात एकूण तीन वेळा जामीन अर्ज दाखल केले असून ते सर्व अर्ज फेटाळण्यात आले होते. वैद्यकीय कारणास्तव आंबेकर याच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button