
राजापूर तालुक्यात स्वयंरोजगाराच्या नावाखाली अनेक महिलांची आर्थिक फसवणूक, प्रशासनाला निवेदन
राजापूर तालुक्यात स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र या संस्थेने ही फसवणूक केली असून न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी प्रशासनाला सादर केले आहे.
महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र या संस्थेच्या कोल्हापूर येथील एका महिलेने व राजापुरातील एका महिलेच्या ओळखीचा वापर करून राजापूर शहरात संस्थेचे कार्यालय सुरू केले व तालुक्यातील अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या नावाखाली लघुउद्योग स्थापन करण्यास प्रवृत्त केले व त्यांना बँकेचे कर्ज प्रकरण करून दिले. महिलांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेतून त्यांना यंत्रसामुग्री देऊन तसेच कच्चा माल पुरवून पक्का माल खरेदी करण्याचे आश्वासन दिले. सुरूवातीचे काही महिने संबंधितांकडून कच्चा माल देऊन तयार झालेला पक्का माल घेतला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून हा संपूर्ण व्यवहार बंद झाला आहे. कच्चा मालही संबंधित संस्थेकडून दिला जात नाही.
www.konkantoday.com




