
राजापूर काँग्रेसला मोठे खिंडार! तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकरांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश

राजापूर तालुक्यातील राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली असून, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे राजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. प्रवेशावेळी आमदार किरण सामंत यांनी सर्व नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
स्थानिक विकासकामे, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे मत जितेंद्र खामकर व अन्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या घडामोडीमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, ही घटना खळबळजनक राजकीय बातमी म्हणून पाहिली जात आहे.
यावेळी काँगेस राजापूर तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर,सुभाष बाकालकर, संतोष कुळे, सरपंच पागरे वैष्णवी कुळे, प्रतिभा रेडीज, डॉ. हसन लांजेकर, संजय पाटेकर, संदेश मोरे, शैलेश संसारे, जानवी धावणंकर, सतीश बंडबे, विनोद बाकाळकर, तुषार नवरेकर, दिनेश बाकालकर, मयूर खानविलकर, प्रशांत बाकालर, रोहन कुवेसकर यांनी तसेच अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे.
यावेळी माजी आमदार राजन साळवी, अविनाश लाड, राजू कुरूप, अशपाक हाजू, रविंद्र नागरेकर आदी उपस्थितीत होते.




