
राजापूर अर्बन बँक अध्यक्षपदी ऍड. शशिकांत सुतार
राजापूर अर्बन बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक गुरुवारी पार पडली असून सुकाणू समितीच्या धोरणानुसार एक वर्षाच्या अध्यक्षपदासाठी संचालक ऍड. शशिकांत सुतार यांची तर उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सुकाणू समितीच्या धोरणानुसार मावळते अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. राजापूरचे संतोषकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर अर्बन बँक राजापूर शाखेच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. अर्बन बँकेवर सत्तास्थानी असलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्यावतीने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एक वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलेला आहे. अध्यक्षपदासाठी यापूर्वीच ऍड. सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.
एक वर्षाच्या अध्यक्षपदासाठी संचालक ऍड. सुतार याची उपाध्यक्षपदी गादीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. ऍड. सुतार व गादीकर यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होताच त्यांना अनेकांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.www.konkantoday.com




