
रत्नागिरी शहरात नव्या पाईपलाईनची गळती सुरूच नूतन नगराध्यक्षांना आव्हान
रत्नागिरी शहरात नव्या नळ योजनेचे काम झाल्यापासून अनेक ठिकाणी हे पाईप वारंवार फुटत आहेत मागील नगराध्यक्षांच्या काळापासून ते प्रशासक काळात देखील हे पाईप फुटण्याचे प्रमाण कमी झाले नव्हते त्यामुळे काही ठराविक भागात हे पाईप वारंवार फुटत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याने पाण्याचे मोठे नुकसान होत आहे आज सकाळी राम आळी नाक्यावर पूर्वीच्या चव्हाण हॉस्पिटल जवळ पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले या पाणी योजनेच्या कामाच्या दर्जा बाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत पाईपलाईन फुटण्याचे प्रकार थांबवण्यात नगर परिषदेला अद्यापही अपयश आलेले आहे आता नूतन नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे यांच्यासमोर ही नव्या योजनेच्या पाईपलाईनचे गळती थांबवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे




