
रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव रेल्वे पुलावर रेल्वेची धडक, अज्ञात प्रौढाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी शहरा नजीक च्या कुवारबाव ब्रिजवर रेल्वेची धडक बसलेल्या अज्ञात प्रौढाचा मृतदेह शनिवारी दुपारी 3.57 वा.सुमारास आढळून आला.दिवा-पॅसेंजर रेल्वेची कुवारबाव ब्रिजवर एका अज्ञात प्रौढाला धडक बसल्यामुळे त्याच्या शरिराचे दोन भाग होवून त्याला गंभिर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.




