
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे फाटा येथे दुचाकी घसरुन तरुण जखमी
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे फाटा येथे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. चंद्रेश प्रतापसिंग गौड (२५, रा. चिरेखाण-निरुळ, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत. पूर्णगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रेश हा २७जानेवारी रोजी दुपारी दुचाकीवरुन नाखरे फाटा येथून जात होता. यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने ता रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. पूर्णगड पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.
www.konkantoday.com




