रत्नागिरी जिल्ह्यातील 38 हजार 500हून अधिक अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासा मिळणार


रत्नागिरी जिल्ह्यातील 38 हजार 500हून अधिक अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासा मिळणार आहे. मार्च 2026 या सहामाही कालावधीसाठी जिल्ह्याला 2 हजार 172 क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे.पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दरमहा प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर वितरीत करण्यास सुरुवात झाली पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकावर एक किलो साखर दिली जाते. अंत्योदय शिधापत्रिकाधारक या योजनेसाठी पात्र आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला एक किलो साखर मिळणे अपेक्षित होते. मात्र मागील दीड वर्षापासून शासनाकडून रेशन दुकानदारांना साखर पुरवठा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे लाभार्थ्यांना दीड वर्षापासून साखर मिळत नव्हती. लाभार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर राज्य शासनाने साखर वितरण करण्यास नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button