रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे


खेड नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीला विश्वासात न घेतल्याचा अनुभव आल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिल्ह्यात स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे केली. द. ग. तटकरे सभागृहात झालेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तटकरे म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. कार्यकर्त्यांची ही आग्रही मागणी आणि पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची भक्कम बांधणी असून कार्यकर्त्यांच्या बळावर जि. प. व पं. स. निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव म्हणाले, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अजय बिरवटकर यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या ताकदीवर येणार्‍या निवडणुका जिंकण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही केले. याप्रसंगी शेखर निकम, महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button