
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने सन २०२५-२६ साठी देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने सन २०२५-२६ साठी देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची – घोषणा करण्यात आली आहे. ग्रंथालय चळवळीत मोलाचे – योगदान देणार्या मान्यवरांचा यामध्ये गौरव करण्यात येणार आहे.
सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार – महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार कमलेशा जनार्दन मुसलोणकर (संचालक, दुर्वांकुर ग्रंथालय, दापोली) यांना, तर उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार पद्मजा प्रेमप्रकाश कारेकर (ग्रंथपाल, नगर बाचनालय, राजापूर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात
आला आहे. यावर्षीपासून उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार नव्याने सुरू करण्यात येत असून, ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणार्या श्री शिंगेश्वर वाचनालय, शिरशिंगे (वर्गड), ता. दापोली, जि. रत्नागिरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशनाचे आयोजन शनिवार, दि. ७ फेब्रुवारी आणि रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या अधिवेशनात सर्व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांचे रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे तसेच संघाच्या सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com




