रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत आज रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत हे आज (१९ जानेवारी) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

१९ जानेवारी पहाटे ४ वाजता ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईवरून चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व चिपळूणकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता चिपळूण तालुक्यात, दुपारी १२ वाजता संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे, दुपारी २.३० वाजता रत्नागिरीतील येथील संपर्क कार्यालयात, सायंकाळी ५ वाजता लांजा तालुक्यातील संपर्क कार्यालयात तर सायंकाळी ७ वाजता राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात कार्यकारणी समवेत बैठक घेणार आहे.
दिवसभर कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते सोईनुसार सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button