
मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेंची शिवसेनेची सत्ता येणार
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने 100 चा आकडा पार केला आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे आणि मनसे मिळून 65 जागांवर स्थिर आहे.भाजप तब्बल 80 जागांवर तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 22 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 55 जागांवर तर, मनसे आठ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची कामगिरी देखील खालावली असून अवघ्या 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेंची शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे चित्र आहे.




