मुंबईतील गोरेगावमध्ये घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा मृत्यू


मुंबईतील गोरेगावमध्ये घराला लागलेल्या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गाढ झोपेत असतानाच फ्रीजचा स्फोट झाला. या आगीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटानास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणली गेली, पण तोपर्यंत ३ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. गोरेगाव पोलिसांकडून या घटनेची नोंद केली असून तपास केला जात आहे.

मुंबीतील गोरेगाव पश्चिममधील भगतसिंह नगरमध्ये एका सोसायटीमधील घराला भयंकर आग लागल्याची घटना पहाटे घडली. ही आग घरातील फ्रीजचा स्फोट झाल्यामुळे लगाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. या भीषण आगीमध्ये ३ जणांचा होरपळून जिवंत मृत्यू झालाय. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button