मिऱ्या गावात गेल्या चार दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई


मिऱ्या गावातील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरचेरी परिसरात असलेली मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आलीगेले 4 दिवस नळपाणी योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मिऱ्या परिसराला एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पांढरासमुद्र येथील टाकीत पाणी जमा हो ऊन ते पुढे पाईपलाईनद्वारे मिऱ्या परिसरात सोडले जाते.

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button