
मिर्या बंधार्यासाठी अजून ८० कोटींची आवश्यकता
रत्नागिरीच्या किनारपट्टीचे संरक्षण करणार्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामासाठी सुरूवातीला १८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या कामासाठी २५ कोटींच्या तातडीच्या निधीची आवश्यकता आहे. संपूर्ण बंधारा आणि उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ८० कोटी रुपयांच्या निधीची अडचण भासत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी वन विभागाची जमीन आणि नगरपालिका रस्ता यांचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे अडथळे आता दूर झाले आहेत. विशेष म्हणजे बंधारा समुद्रात आत बांधल्यामुळे किनारपट्टीची साधारण ४० फूट जागा सुरक्षित झाली आहे. भविष्यातील धूप रोखण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
मिर्या बंधार्याचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील घरांना आणि किनारपट्टीला समुद्राच्या रौद्र लाटांपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळणार आहे. आता प्रशासकीय पातळीवरून या उर्वरित कामासाठी लागणारा निधी कधी उपलब्ध होतो, याकडे मिर्यावासियांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com




