महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा-2025 रविवारी1190 उमेदवारांची बैठक व्यवस्था रत्नागिरी तालुक्यातील ३ उपकेंद्रांवर


*रत्नागिरी, दि. 1 ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 ही परीक्षा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी तालुक्यातील 3 उपकेंद्रावर एक सत्रामध्ये (प्रत्यक्ष परीक्षेची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 12.00) या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 1190 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील उपकेंद्रांवर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी उपकेंद्रावर RT001001 ते RT001336, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी उपकेंद्रावर RT002001 ते RT002360, फाटक हायस्कूल रत्नागिरी या उपकेंद्रावर RT003001 ते RT003494 बैठक व्यवस्था आहे.
परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना :-
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button