मध्यप्रदेश राज्यातील पचमढी येथे पार पडलेल्या नॅशनल रॉक क्लायबिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गिर्यारोहकांनी मोहर उमटवली


मध्यप्रदेश राज्यातील पचमढी येथे पार पडलेल्या पचमढी क्लायबिंग चॅलेंज २ या राष्ट्रीय रॉक क्लायबिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गिर्यारोहकांनी आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली आहे. जिद्दी माऊंटेनिअरिंग संस्थेच्या सृजन सतीश पटवर्धन याने १७ वर्षाखालील गटात तृतीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळवले तर प्रसाद अनंत शिवगण याने १७ वर्षाखालील गटात सहावा क्रमांक मिळवला आहे.
भारतीय गिर्यारोहण संस्था वेस्ट झोन कमिटीच्या वतीने ९ ते ११ जानेवारी दरम्यान पचमढी येथील जटाशंकर रॉक फेस या नैसर्गिक खडकावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील नामवंत गिर्यारोहकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ताकद, सहनशक्ती, एकाग्रता आणि वेळेचे नियोजन यांची ही मोठी कसोटी होती. हे दोन्ही खेळाडू रत्नागिरीतील जिद्दी माऊंटेनिरिंग या संस्थेचे सभासद आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button