मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात


मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ,०३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जातात, ज्यांनी ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षण व सामाजिक क्रांतीचा पाया रचला. सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धा, जातीयता आणि स्त्रीदास्य यांसारख्या सामाजिक अडथळ्यांना आव्हान दिले. त्यांचे कार्य आजही शिक्षण, समता आणि न्यायासाठी प्रेरणादायी आहे.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button