मंडणगड तालुक्यातील जांभूळनगर येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा जयश्री जीतेंद्र बर्जे यांचे सर्पदंशाने निधन


मंडणगड तालुक्यातील जांभूळनगर येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा जयश्री जीतेंद्र बर्जे (३२, जांभळूनगर) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. बर्जे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले होते. त्यानंतर त्या शेतावर कामास गेलेल्या असताना सायंकाळी ही घटना घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
जांभूळनगर येथील रहिवासी जयश्री बर्जे या आपल्या घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसर्‍यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पायाला दंश केल्याचे समजताच त्यांनी तातडीने आपल्या घरी धावत जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच बर्जे यांचा मृत्यू झाला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button