
ब्रेकिंग न्युज -अजित पवारांच्या विमानाचा बारामतीत भीषण अपघात; अजित पवारांसह अन्य लोक गंभीर जखमी
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटनाआज बारामतीत अजित पवार यांची सभा होती. यावेळी हा अपघात झाला आहे. एका शेतात हे विमान कोसळलं. त्यानंतर त्यातून धुराचे मोठे लोट देखील निघाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या अपघातात अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ जात असताना बारामती विमानतळावर हा अपघात झाला. या अपघातात विमानात असलेले काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अजित पवार हे आज बारामती तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी चार प्रचारसभांना संबोधित करणार होते. अपघाताची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी, हा अपघात लँडिंग दरम्यान झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजीत शिवतारे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि अन्य कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे. जखमींची नेमकी ओळख अजून समोर आलेली नाही. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे




