
बिबट्याने उडी मारल्याने मोटरसायकल घसरल्याने तरुण जखमी
मोटरसायकलवरून घरी जात असताना अचानकपणे बिबट्याने मोटरसायकल स्वारावर झेप घेतली. मात्र त्याचा हल्ला चुकवण्याच्या नादात मोटरसायकल घसरली व तोल जाऊन खाली पडल्याने २६ वर्षीय तरुण जखमी झाला.मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तो बालमबाल बचावला आहे .लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे गावातील घोडखिंड येथे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला कुवे माळवाडी येथे राहणारा योगेश सुधीर पवार (वय २६ वर्षे) हा बुधवारी सायंकाळी आपले काम आटोपून रात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटर सायकलने घरी चालला होता. कुवे घोडखिंड या ठिकाणी तो आला असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्या दिशेने झेप घेतली. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे मोटरसायकलस्वार योगेश पवार हा घाबरून गेला. मात्र तरीही प्रसंगावधान राखून बिबट्यापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःला मोटारसायकलवर स्वतः ला झोकून दिले. तर त्याच्या पाठीमागे असलेल्या बॅगेमुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून तो बालमबाल बचावला. मात्र मोटरसायकल घसरून पडल्याने तो जखमी झाला. त्यानंतर बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.
या घटनेत योगेश पवार याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली




