बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन शिक्षक निलंबित; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ!


राज्य शासनाकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे शोध मोहिमेत सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली असून यात मंडणगड येथील एक व रत्नागिरी येथील दोन शिक्षकांचा समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि इतर भत्त्यांची कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तीन प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदे मार्फत ९० शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.

जिल्हा परिषदेकडुन निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये महावीर सोमनाथ मिसाळ, उपशिक्षक (मंडणगड), प्रदीप कृष्णा मोरे, उपशिक्षक (रत्नागिरी), राजेश महादू भंडारे (रत्नागिरी) अशी शिक्षकांची नावे आहेत.

प्राथमिक चौकशीत निलंबित शिक्षकांनी त्यांच्या प्रत्यक्ष शारीरिक दिव्यांगतेपेक्षा अधिक टक्केवारी दाखवणारी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय सवलती मिळवण्यासाठी ही कागदपत्रे वापरून त्यांनी वाहतूक भत्ता तसेच दिव्यांगांसाठी असलेले इतर आर्थिक लाभ नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button