
प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्रधारकांना आॕनलाईन Unique Disability ID (UDID) बंधनकारक15 जानेवारी ते 5 फेब्रुवारी कालावधीत तालुकानिहाय विशेष शिबिरे
रत्नागिरी, दि. 12 ) : ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे आरोग्य विभागाकडील जुन्या ऑफलाईन हस्तलिखित किंवा प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्रे आहेत, त्यांनी संगणक प्रणालीद्वारे Unique Disability ID (UDID) ऑनलाईन काढणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्ह्यात दि. 15 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करून ते रुपये 2,500/- इतके करण्यात आले आहे. सदर वाढीव अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या DBT पोर्टलवर लाभार्थ्याच्या नावासमोर Unique Disability ID (UDID) क्रमांक अपलोड असणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय UDID शिबीर तपशील
दि. 15 जानेवारी रोजी दापोली तालुक्यात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता उपजिल्हा रुग्णालय, दापोली, दि. 19 जानेवारी रोजी गुहागर तालुक्यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता ग्रामीण रुग्णालय, गुहागर, दि. 20 जानेवारी रोजी खेड तालुक्यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी, दि. 22 जानेवारी रोजी लांजा तालुक्यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता तहसीलदार कार्यालय, लांजा (सभागृह), दि. 27 जानेवारी रोजी चिपळूण तालुक्यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता उपजिल्हा रुग्णालय कामथे, दि. 29 जानेवारी रोजी मंडणगड तालुक्यात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता ग्रामीण रुग्णालय, मंडणगड, दि. 3 फेब्रुवारी रोजी राजापूर तालुक्यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता ग्रामीण रुग्णालय राजापूर, दि. 5 फेब्रुवारी रोजी संगमेश्वर तालुक्यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यात दर बुधवार व शुक्रवारी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते. परंतु, अद्यापही Unique Disability ID (UDID CARD) नाही अशा लाभार्थ्यांनी शिबीराच्या तारखेपूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह Unique Disability ID (UDID CARD) काढण्याकरिता जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांचे मार्फत https://swavlambancard.gov.in या वेबलिंक वर आवश्यक त्या माहीतीसह ऑनलाईन अर्ज दिव्यांग लाभार्थ्यांचे नातेवाईक/हितचिंतक यांच्यामार्फत आपल्या तालुक्यातील शिबीराचे तारीखे पूर्वी करावा जेणेकरुन शिबीराच्या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याचा वेळ वाचेल.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे
अर्थसहाय्य मिळते पंरतु त्यांचेकडे अद्यापही अद्यापही Unique Disability ID (UDID CARD) नाही अशा लाभार्थ्यांनी वरील शिबीरात सहभागी होऊन स्वत:चे UDID CARD काढून घ्यावे व शासनास सहकार्य करावे. ज्या दिव्यांग लाभार्थाकडे UDID CARD आहे परंतू Aadhar E-kyc केलेली नाही अशा व्यक्तीनी महा- ई- सेवा केंद्र किंवा जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र यांचेशी संपर्क साधून Aadhar E-kyc करुन घ्यावी व त्याची प्रत तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावी.




