
प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ, डॉ माधवराव गाडगीळ यांचे पुणे येथे दु:खद निधन
पुणे-
काल बुधवारी रात्री प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ, डॉ माधवराव गाडगीळ यांचे पुणे येथे दु:खद निधन झाले.
पर्यावरण संतुलन व संरक्षणासाठी आयुष्य भर त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. वैज्ञानिक दूरदृष्टी ला, पर्यावरणाप्रती तळमळ असलेलं हे नेतृत्व होतं. महाराष्ट्र शासनाच्या कोकण व पश्चिम घाटाच्या पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते गाडगीळ समितीने अनेक शिफारशी शासनाकडे गेल्या आहेत.
कोकण व पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवण्यासाठी माधवराव गाडगीळ यांच्या समितीने अनेक शिफारशी केल्या आहेत वृक्षतोड बंदी नद्या येथील जैवविविधता ही टिकवण्यासाठी काय करावे लागेल यासाठी महत्त्वाच्या शिफारशी त्यांनी केल्या होत्या.
माधवरावांनी विद्यार्थ्यामध्ये नागरिकांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल यासाठी अभिनव उपक्रमशील प्रयोग केले आहेत
त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे, मुंबई या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदवी घेऊन नंतर हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पीएच.डी केली होती. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.
इ.स. १९७३ ते २००४ पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हार्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते.
ते पश्चिम घाटावरील संशोधनासाठी आणि पर्यावरण धोरणांमधील योगदान अत्यंत महत्त्वाच राहिला आहे
‘गाडगीळ आयोग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाट पर्यावरण तज्ञ पॅनेलचे ते अध्यक्ष होते. त्यांनी या परिसराची दौरा करून गाडगीळ समितीने मोठा अभ्यास अहवाल तयार केला होता व तो शासनाकडे सुपूर्द केला होता
त्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र आणि मानवी पर्यावरणशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले.
केंद्र शासनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता




