
पालवण येथे होणार्या ग्रामीण, कृषी, सहकार राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनासाठी शरद पवार, दोन उपमुख्यमंत्री फेब्रुवारीत चिपळूणमध्ये
चिपळूण तालुक्यातील पालवण येथे फेब्रुवारी महिन्यात होणारे ग्रामीण, कृषी, सहकार राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक व्यासपीठ न राहता राज्याच्या राजकारणातही विशेष लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे. संमेलननिमित्त केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे चिपळूण दौर्यावर येणार आहेत.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या संकल्पनेतून १३ फेब्रुवारीपासून तीन दिवस पालवण येथे साकार होत असलेले हे संमेलन ग्रामीण जीवन, कृषी अर्थव्यवस्था आणि सहकार चळवळ यांचा त्रिवेण संगम साधणारा राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग मानला जाणार आहे. या संमेलन उदघाटनाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येण्याचा शब्द डॉ. चोरगे यांना दिला आहे. आमदार शेखर निकम यांनीही मध्यंतरी पवार यांची भेट घेवून याबाबतचे निमंत्रण दिले आहे.www.konkantoday.com




