पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर भूमी अभिलेख विरुद्धचे उपोषण स्थगित


रत्नागिरी भूमी अभिलेख विभागाच्या चुकीच्या कारभाराविरोधात २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऍड. गौरव शेलार व देवेंद्र शेलार यांनी पुकारलेले उपोषण पालकमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. सामंत यांनी संबंधित चूक दुरुस्त करुन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याचे आदेश विभागाला दिले. यानंतर गौरव व देवेंद्र शेलार यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले. भूमीअभिलेख विभागाकडून स्वतंत्र मालकीच्या जागेतील नकाशामध्ये झालेली चूक दुरुस्त करून मिळावी व भूमी अभिलेख विभागाच्या मनमानी आणि चुकीच्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी उपोषण पुकारले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button