पालकमंत्री उदय सामंत यांचा उबाठाला दणका,मिरजोळे शिवसेना उबाठा विभाग प्रमुख वैभव विठोबा पाटील, माजी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, शिवसेना उबाठा उपविभाग प्रमुख डॉ. मयुरेश पाटील, आदींचा शिंदे शिवसेनेत प्रवेश


राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत बाळासाहेब ठाकरे सभागृह ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळे येथे काल रात्री १२ वाजता आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना उबाठा विभाग प्रमुख वैभव विठोबा पाटील, माजी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, शिवसेना उबाठा उपविभाग प्रमुख डॉ. मयुरेश पाटील, शिवसेना उबाठा विभाग संघटक शुभानंद पाटील, युवा सेना विभाग प्रमुख विकास सनगरे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य संचिता सनगरे, खेडशी उपसरपंच मानसी पेडणेकर, मंगेश पेडणेकर, शाखा प्रमुख संजय पाडावे, युवा सेना शाखा प्रमुख प्रियेश कांबळे यांनी शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचा सन्मान करुन, त्यांचे पक्षात स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button