’पार्सल’ व्यवसायात पोस्ट रत्नागिरी विभागाची गरूड झेप


पोस्ट ऑफिस हे १७१ वर्ष जुने केंद्र सरकार अंतर्गत खाते असून, भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एक सरकारी यंत्रणा असूनही आणि ’पत्र’ व ’पार्सल’ याला अनेक पर्याय उपलब्ध असूनही पोस्ट ऑफिस नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे स्वतःमध्ये अनेक बदल करून ग्राहकाभिमुख सेवा देत, स्पर्धेमध्ये टिकून आहे.
खासगी कुरिअर सेवा हा मोठा स्पर्धक असल्याने त्या दर्जाची सेवा आता पोस्ट ऑफिस देते. पॅकिंग सुविधा, टॅक आणि ड्रेस, क्लिकअँड बुक व काही योजनांसाठी ’फ्री पिकअप’ या सर्वांचा परिणाम म्हणून गत सहामाहीमध्ये पोस्ट  ऑफिसने रत्नागिरी विभागात गरुडझेप घेतली आहे. जून डिसेंबर २०२५ संपलेल्या सहामाही मध्ये जवळजवळ आठ लाखांपेक्षा जास्त व्यवसाय रत्त्नागिरी विभागाने केला आहे.
भारतीय डाक विभागाने केलेल्या अनेक बदलांमुळे आज अनेक ग्राहक पोस्ट ऑफिसकडे आकृष्ट होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी आहेत, त्यांना घरचा खाऊ व वस्तू अत्यंत वाजवी दरात पोस्ट ऑफिसमार्फत पाठविता येत असल्याने पालक वर्गाने पोस्ट ऑफिसकडे प्रत्यक्ष भेटून समाधान बाल केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button