पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांपासून मानवी वस्ती व शेतशिवाराच्या बचावासाठी निर्माण केले अभिनव सौर बुजगावणे


राजापूर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  असताना या संकटावर उपाय शोधण्यासाठी शासन स्तरावर फारशी हालचाल होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पाचल येथील सरस्वती विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सत्यनारायण देसाई व त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौर बुजगावणे हे अभिनव मॉडेल विशेष लक्ष वेधून घेत आहे.
मानवी वस्ती व शेतशिवाराच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारे हे सौर बुजगावणे गोल फिरणारे असून ते स्थिर राहत नाही. रात्रीच्या वेळी कार्यरत होणार्‍या या यंत्राच्या हातावर व डोक्यावर बसवण्यात आलेल्या बॅटरीमधून आजुबाजूच्या परिसरात तीव्र प्रकाश पडतो. या प्रकाशामुळे बिबट्या तसेच इतर वन्यप्राणी ज्या भागात येण्यास टाळतात. या बुजगावण्याच्या एलडीआर सेन्सर व मोशन सेन्सर जोडण्यात आले आहेत. वाडीवरस्ती अथवा चारपाच घरांच्या परिसरात हे यंत्र बसवले असता अंधार पडताच संपूर्ण सर्किट आपोआप कार्यरत होते. परिसरात ठिकठिकाणी लाईट पेटत राहतात व आवाज निर्माण होतो. त्यामुळ वन्यप्राणी घाबरून मानवी वस्तीपासून दूर राहतात.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button