
नुकत्याच पार पडलेल्या मार्लेश्वर यात्रेतून एसटीला लाखोचे उत्पन्न
संगमेश्वर तालुक्यातील मारळ नगरीत पार पडलेल्या मार्लेश्वर यात्रोत्सवासाठी देवरुख आगारातून जादा बस फेर्या सोडण्यात आल्या होत्या. यातून देवरुख आगाराला ७ लाख ८७हजार ८३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
सह्याद्रीच्या कडेकपारीत, मारळ नगरीत श्री मार्लेश्वर देवस्थान बसलेले आहे. नवसाला पावणारे हे देवस्थान आहे. निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. यामुळे भाविक व पर्यटकांची पावले आपसुकच तीर्थक्षेत्री वळतात. मकरसंक्रातीला तीर्थक्षेत्री आंगवलीचा श्री देव मार्लेश्वर साखरप्याची गिरीजा देवी यांचा कल्याणविधी सोहळा थाटात संपन्न होतो. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भाविक तीर्थक्षेती दाखल होतात.
भाविकांचा प्रवास सुखाचा व्हावा देवरुखसह ११११२ आगारातून जादा बस फेर्या सोडण्यात येतात. देवरुख आगारातून २७ जादा बस सोडण्यात आल्या होत्या. यातून आगाराला एकूण ७ लाख ८७हजार ८३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात्रोत्सवाच्या यशस्वीसाठी चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी यांनी मेहनत घेतली.www.konkantoday.com




