
धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
रत्नागिरी, दि. 15 ) : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी कार्यक्रम 13 जानेवारी 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी निर्बंध घातले आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन (दि. 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत) निर्बंध घातले आहे.
प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.




