
देवरुखजवळील मारळ ते बामणोली रोडवर मिक्सरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
देवरुखजवळील मारळ ते बामणोली रोडवर शनिवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. रस्ते कामावरील खडी आणि वाळू मिक्स करणार्या एक्सेज मिक्सर गाडीने दिलेल्या धडकेत एका पादचारी महिलेला आपली जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास बामणोली येथील कातळ स्टॉपजवळ ही घटना घडली. संबंधित महिला काजूच्या बागेतील साफसफाईचे काम संपवून आपल्या घराकडे पायी चालत जात होती. याच दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी चालक मोनू आत्मज मांगी (२३, रा. उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील मिक्सर गाडी अतिवेगाने आणि निष्काळजीपणे पाठीमागे (रिव्हर्स) घेत होता. यावेळी पाठीमागून येणार्या महिलेला मिक्सरची जोरदार धडक बसली आणि गाडीचे चाक त्यांच्या डाव्या पायावरून गेले. या भीषण अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी दीपक पांडुरंग गराटे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.www.konkantoday.com




