दापोली–मुरुड येथे मिनी बसचा अपघात, तीन कारला धडक देत मिनी बस पलटी


दापोली तालुक्यातील मुरुड येथे पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या MH 12 VF 9390 क्रमांकाच्या मिनी बसचा अपघात झाला आहे. सदर मिनी बस रस्त्यावर पलटी होऊन समोरून येणाऱ्या दोन ते तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे.या अपघातात तीन कारचे नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मिनी बसचा चालक जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सलग तीन दिवसांची सुट्टी असल्यामुळे मुरुड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. अपघातानंतर मुरुड मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता, त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button