
दापोली तालुक्यात आंबा बागायतींवर यंदा ’वांझ’ मोहोराचे संकट
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वाशीच्या बाजारपेठेत मानाची पहिली पेटी पाठवण्याचा मान दापोली तालुक्यातील बागायतदार पटकावतो. मात्र यावर्षी हा मुहूर्त हुकला असून हापूस यंदा बागांमध्येच अडकून पडला आहे. एकंदरीत पाहिले तर हापूसची प्रथम चव घेण्यासाठी ग्राहकांचा ध्यास वाढला असला तरी बदलेल्या वातावरणामुळे जवळपास ७० टक्के मोहोर ’बांड असल्याने बागामेतवार आहेत. त्यात अनियमित थंडीमुळे उशिरा फळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दापोलीतील आंबा व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बागांमध्ये ७० टक्के मोहोर हा ’वांझ’ (ज्याला चिंताग्रस्रफळ धरत नाही) असल्याचे दिसून येत आहे. मोहोर भरघोस आला आहे, पण त्याचे फळात रुपांतर होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्या सुपारीपेक्षा लहान फळे तयार होत आहेत.
कीड आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव बदलत्या हवामानामुळे केवळ मोहोर गळती व वांझ मोहोर एवढीच संकटे नसून तुडतुडे आणि विविध कीडींचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे.www.konkantoday.com




