
दापोली तालुक्यातील विविध शाळांतील सहा विद्यार्थ्यांची नासा-इस्त्रोसाठी निवड
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून नासा आणि इस्त्रो दौर्यासाठी सहा विद्यार्थिनींची निवड झाली आहे. यामध्ये चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलूख, निरजा वेदक, किन्हळ शाळेची दिक्षा येसवारे, विरसई शाळेची अक्षरा पाटील, नवशी शाळेची प्राजल खळे, हर्णे क्र. २ शाळेची सृष्टी कोठावळे यांचा समावेश आहे. सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या माध्यमातून जालगाव येथील अजिंक्य तलाठी यांच्या स्मरणार्थ सुधीर तलाठी यांनी या सहा विद्यार्थिनींसाठी जालगाव जिल्हा परिषद शाळेत प्रयोग कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचा फायदा या विद्यार्थिनींना झाला, या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्यासह विविध स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.www.konkantoday.com




