ठाकरे शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत कार्यक्रम

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या (२३ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रत्नागिरी तालुका यांच्या वतीने शिवसेना नेते सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात तसेच शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे.
सकाळी ९.३० वाजता शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल. त्यानंतर १० वाजता माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल. १०.३० वाजता याच ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील सर्व उमेदवार व तालुका कार्यकारणी यांच्यासमवेत बैठक होईल. यावेळी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होईल. यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button