जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लिपिकांचे मूक निषेध आंदोलन

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लिपिका सलग दोन दिवस काळ्या फिती लावून मूक निषेध आंदोलन केले. निषेध आंदोलनाचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना सादर करून शिक्षण विभाग कर्मचारी अधिकारी यांनी मुख्य प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभागात काही ठराविक कर्मचारी संघटनाचें प्रतिनिधी थेट लिपिकच्या टेबल वर येऊन लिपिकलाच धमकवतात असाच एक अनपेक्षित प्रकार गत सप्ताहात घडला होता. थेट कार्यालयात एका प्रतिनिधीने शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजावर बैठक मारून लिपिक, आणि प्रशासनावर आरोप करुन येथील समजून सांगणाऱ्या एका अधिकाऱ्याला अरेरावी करून व्हिडिओ शुटींग देखील केले होते.

या सगळ्या प्रकारनंतर एका लिपिकाचे थेट नाव घेऊन काही सन्घटना कडून निवेदन सादर झाली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग लिपिक आक्रमक झालेले दिसून आले. प्रशासन अधिकारी (नियोजित) राज्य प्रवक्ता संजय नलावडे, विस्तार अधिकारी संदेश कडव, नरेंद्र गावंड, सुजाता कांबळे, यशश्री काणे, रवींद्र कांबळे, नीता देवस्थळी, किशोर रोडे, बबन आडीवरेकर, जयंता रसाळ, चित्रा बाणे, जितेंद्र जंगळी, पराग पाटील, उमेश कोलगे, स्वाती ढोले, रमेश पवार, गौरी तकेल, सुरेखा काकडे, स्वप्नील मिरकर, प्रतीक्षा इंगोले, सिद्धी फेफडे आदी कर्मचारी अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button