
जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर?
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच, आता या प्रक्रिया पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल झाली आहेत्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.




